मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – सद्यस्थितीत सुरु असलेल्या कोरोनाच्या महामारीतही मैत्री प्रतिष्ठान मुंबई या संस्थेकडून गणेश चतुर्थी निम्मित “गणपती मखर सजावट स्पर्धा २०२० चे” आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा इको फ्रेंडली होती.
या उपक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, घरातील टाकाऊ वस्तू आपण गणपती मखर सजावट करण्यासाठी वापर करायचा आणि परत त्या वस्तूंचा वापर घरगुती कामासाठी करायचा तसेच त्या वापरलेल्या वस्तू पासून निसर्गाला कोणतीही हानी पोचू देणार नाही. या सुंदर कल्पकतेवर आधारित मैत्री प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली होती.
या स्पर्धेत एकूण ८० जणांनी महाराष्ट्रातून आपला सहभाग नोंदविला होता. दिनांक १० सप्टेंबर २०२० ला या स्पर्धेचे तीन विजेते घोषित करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांक सांगलीतील खरशिंगचे अभिजीत शिंदे, द्वितीय क्रमांक मुंबईचे हेमंत पोवार आणि तृतीय क्रमांक मानपाडा ठाण्यातील मनोज सहानी असे घोषित करण्यात आले आहेत. हा उपक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष दिनू रिकामे, उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, सचिव कृणाल चव्हाण तसेच उपसचिव नितीन शिंदे, कार्याध्यक्ष अनिकेत साटम आणि उपक्रम प्रमुख राहुल कानसे, विक्रांत पड्याळ, जितेंद्र करमळकर इत्यादींनी आपले उपक्रमास वैयक्तिक हातभार लावून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.







