मुंजलवाडी ते रावेर आणि मुंजलवाडी ते रमजीपूर रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था

रावेर (हमीद तडवी) – तालक्यातील मुंजलवाडी ते रावेर आणि मुंजलवाडी ते रमजीपुर या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून,हे रस्ते अपघातास कारणीभूत ठरत आहे. या रस्त्याने वाहन चालकांना प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने प्रवास करीत असतांना रस्त्यात खड्डा आहे,का? खड्डयात रस्ता?हेच समजायला मार्ग नाही जणू दारु प्यायल्यासारखी वाहने डुलत-डुलत चालवावी लागत आहे.
या रस्त्याने पायी चालणे देखील जिकरीचे झाले आहे, कारण रस्त्यांच्या भागाचा केव्हा तुकडा पडेल याचा नेम नाही? पाल ते इंदौर हायवे बनल्याने मोठ्या वाहनांची जास्त वर्दळ या रस्त्याने असते. क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे ट्रक हे मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, उत्तरप्रदेश मधून येणारे असतात. यामुळे या मुंजलवाडी जवळील दोन्ही पुलांजवळ झालेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवीतहानी होणे नाकारता येत नाही.
या रावेर ते मुंजलवाडी रस्त्याने संबधित बांधकाम विभागाचे अधिकारी नेहमी ये-जा करीत असतात तरीही त्यांना या पुलांजवळील खड्यांचा धोका कळत नाही का? याचा अर्थ असा होतो की संबधित अधिकारी व पदाधिकारी यांना या रस्त्याचा संपुर्ण प्रकार माहिती असल्यावरही डोळे मिटुन दुधावरची मलाई खात आहेत आणि परिसरातील शेतकरी, मजुर, महीला, प्रवाशी, वाहनचालक यांच्या जीवाशी खेळत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे. तरी संबधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी या रस्त्यांच्या खड्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करण्याचे काम ताबडतोब हाती घ्यावे अशी परिसरातील नागरिक, वाहनचालक, शेतकरी, मजुर यांचेकडुन मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here