मुंबईत एका दिवसाला ५०० किलो ड्रग्ज होतात फस्त

मुंबई (हितेश मिस्त्री) – अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाचा शोध सुरू असतानाच अनेक गोष्टींचा पर्दाफाश होत आहे. दरम्यान, या प्रकरणात रिया चक्रवर्तीची कसून चौकशी केली असता चौकशीत रियाने सुशांतसाठी ड्रग्ज मागवल्याची कबुली दिली. इतकेच नव्हे तर ड्रग्ज सेवनसंदर्भात अन्य खुलासे केले.
दरम्यान, नार्कोटिक्स विभागाचे वरिष्ठ निरिक्षक सुहास गोखले यांनी मुंबईच्या नशेसंदर्भात मोठा खुलासा केला. सुहास गोखले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबईत दररोज ५०० किलो ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा दावा केला. रिया चक्रवर्तीच्या कबुलीनंतर नवनवीन गोष्ट समोर येत आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत. रिया चक्रवर्तीने अभिनेत्री सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग आणि सिमोन यांची नावे घेतली आहेत.
दरम्यान, एनसीबीने ड्रग्ज डीलर्स आणि ड्रग्ज पेडलर्सवरील कारवाई सुरूच ठेवत आणखी दोन ड्रग्ज पेडलर्सना बेड्या ठोकल्या आहेत. शोवीकचा शाळेतील मित्र ड्रग्ज पेडलर सूर्यदीप मल्होत्रा आणि गोव्यातून ताब्यात घेतलेल्या ड्रग्ज पेडलर क्रिस कोस्टा यांना अटक केली आहे. दोघांच्या अटकेने आरोपींची संख्या 18 झाली आहे.
एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोवीक, सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, घर मदतनीस दीपेश सावंत या चौघांसह 12 ड्रग्ज डीलर्सना अटक केली होती. त्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या शोवीकचा शाळेतील मित्र आणि ड्रग्ज पेडलर सूर्यदीप मल्होत्रा आणि गोव्यातून ताब्यात घेतलेल्या ड्रग्ज पेडलर क्रिस कोस्टा यांना अटक केली आहे. त्यामुळे एकूण अटक आरोपींची संख्या 18 झाली आहे. यात बॉलीवूडला ड्रग्ज पुरवठा करणार्‍या तब्बल 14 ड्रग्ज डीलर्स आणि ड्रग्ज पेडलर्सचा समावेश आहे.
एनसीबीने अटक केलेल्या संकेत पटेल, संदीप गुप्ता आणि आफताब अन्सारी यांना न्यायालयाने 16 तारखेपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे, तर मल्होत्रा आणि कोस्टा यांना 17 तारखेपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोवीक, सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, घर मदतनीस दीपेश सावंत या चौघांसह 14 ड्रग्ज डीलर्सना अटक केल्यानंतर एनसीबीने आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणात संशयित आरोपींकडून ताब्यात घेतलेली सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासण्यास सुरुवात केली आहे.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात काळ्या पैशांविरोधातील कायद्यानव्ये गुन्हा दाखल करून तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने चित्रपट दिग्दर्शक दिनेश वैजान यांच्याकडे मंगळवारी आठ तास कसून चौकशी केली.
सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलत असलेल्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकारणाशी संबंधित असलेल्या बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पुन्हा एकदा चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here