भिल समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी एकलव्य संघटनेचे निवेदन

भडगाव (प्रतिनिधी) – येथील एकलव्य संघटनेच्यावतीने भिल समाजाच्या अनेक प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्तततेची मागणी करणारे निवेदन आज तहसीलदार, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशानुसार देण्यात आलेल्या निवेदनात भिल समाजाला खावटी कर्ज देण्यात यावे, तसेच आर्थिक मदत करण्यात यावी, रेशन कार्ड व जातीचे दाखले घरपोच देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या असून, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी निवेदन देताना एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रवि सोनवणे, शहराध्यक्ष दशरथ मोरे, विनोद मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here