ब्लॅक पॅथरचे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महिला बचत गटांची बैठक

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – महिला बचत गटांची कर्जे माफ करण्यात यावी यासाठी ब्लॅक पँथरतर्फे आंदोलन छेडण्यात आले आहे. बुधवारी (दि.१६) या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महिला बचत गटांच्या प्रमुख महिलाध्यक्षांची आजरा, ता. आजरा, जि.कोल्हापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास कांबळे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष रामभाऊ कांबळे, सचिन कांबळे आदींनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here