जामनेर तालुक्यातील वाकोद गावचे सुपुत्र…पोलीस वर्दीतील खानदेशी दर्दी कलाकार झाला दिग्दर्शक

हरहुन्नरी पोलीस कर्मचारी संघपाल तायडे यांच्या पहिल्या अहिराणी गाण्याचे चित्रीकरण

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – जिल्हा पोलीस दलातील हरहुन्नरी कलाकार म्हणून साऱ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कलावंत संघपाल तायडे यांच्या ‘ तुला कॉलेजमा भेटायला येसू , या पहिल्याच अहिराणी गाण्याचे चित्रीकरण नुकतेच जळगाव शहरातील विविध निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये पूर्ण करण्यात आले आहे . या गाण्याची विशेषता म्हणजे यामध्ये साउथ इंडियन ट्रॕकवर खानदेशी नृत्य कलावंत थिरकतांना दिसणार आहेत. संघपाल तायडे यांची वर्दीतील दर्दी माणूस अशी ओळख कायम असून त्यांच्या अभिनय कौशल्य आणि गीतांमधून त्यांनी अनेक गाण्यांमध्ये आपला जीव ओतून ते लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचले आहे .
त्यांच्या या पहिल्या अहिराणी गाण्याला सुप्रसिद्ध गीतकार गुलाब गायकवाड यांनी गाणे शब्दबद्ध केले आहे. त्यांचे या अगोदर लाल लाल मना बैरहमलाल चे प्रसिद्ध गीतकार म्ह्णून त्यांची ओळख आहे.
‘ तुला कॉलेजमा भेटायला येसू , या गाण्याचे निर्माते आहेत विठ्ठल गायकवाड सौ. वैशाली गायकवाड, सहनिर्माते हेमंत पाटील, दिग्दर्शक , संगीत आणि अभिनय स्वतः  संघपाल तायडे यांनी संगीतबद्ध केले आहे. सहकलाकार म्हणून त्यांची पत्नी भाग्यश्री तायडे यांची साथ लाभली तर सहदिग्दर्शक सुरेश राजपूत असून कॅमेरामन चारुदत्त वाणी , बाळू वाघ , संतोष ढिवरे . नृत्य प्रशिक्षक सचिन भिरुड उर्फ रँचो ,नृत्य कलाकार विष्णू माळी ,लक्ष्मण गायकवाड ,करण मोरे ,सचिन चव्हाण, करण शिंपी , स्वप्नील इंगळे समाधान सपकाळे ,वरुणराज मैराळे ,प्रभाकर बोदडे यांच्यासह अन्य कलाकार परिश्रम घेत आहे. दरम्यान संघपाल तायडे यांनी याअगोदर कोरोना काळात लोकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करीत आपली कर्तव्यनिष्ठा इमानेइतबारे निभावली आहे . शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पार्शवभूमीवर त्यांनी ‘दुष्काळ ‘ हा लघु चित्रपट प्रसिद्ध केला आहे .यामध्ये जळगाव शहरातील स्थानिक नृत्य कलावंत यांचा सहभाग असून सध्या लाॕकडाउन च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग व कोरोणाचे नियम पाळत या गीताचे चित्रीकरण करण्यात आले. या गीताचे आॕडीओ रेकॉर्डिंग मुंबई येथे करण्यात आले आहे.यापुढेही आपण अशाच प्रकारे जनसामान्यांची सेवा करीत  राहू असे संघपाल तायडे यांनी बुलंद पोलिस टाइम्स्‌च्या प्रतिनिधी सोबत बोलतांना व्यक्त केले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here