भुसावळ (गिरीश पवार) – डॉ. प्रीतम देशमुख यांचे वडील डॉ.वासुदेव देशमुख वय 85 वर्ष यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे.
डॉ.वासुदेव देशमुख यांचं साधारणता 1959 साली कुऱ्हे पानाचे गावात आले. ते मूळ यावल या गावचे रहिवासी आहेत. कुऱ्हा पानाचे या गावातील ते पहिले ऍलोपॅथिक डॉक्टर होते. तसेच न्यू इंग्लिश स्कूल चे व्हॉइस चेअरमन या पदावर त्यांनी सुरुवातीपासून काम केले आहे.त्यांनी गावात खूप सामाजिक कार्य केलेले आहे.गावातील विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार सुध्दा त्यांच्याच पुढाकाराने झाला.त्यांनी आपल्या गोड वाणीने आणि सुस्वभावा ने सर्वांच्याच मनावर राज्य केलं. त्यांनी त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्याला सुशिक्षित आणि सुसंस्कृत करून पुढे नेलं. समाजकार्यात त्यांचा मोलाचा सहभाग असायचा,त्यांचा मोठा मुलगा डॉक्टर प्रितम देशमुख हे आजही गावात वैद्यकीय सेवेतून सेवाकार्य करत आहेत.
सतत हसतमुख असलेली ही व्यक्ती डॉ. वासुदेव देशमुख आज आपल्यात नाहीत.त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी , तीन मुले व नातवंडे असा परिवार आहे.गावातील सर्व कुटुंबाशी सामाजिक व प्रेमाचे नाते सांगणाऱ्या देशमुख परिवाराच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी आहेत आबांना भावपूर्ण श्रद्धांजली..







