मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – मुंबई पोलीस आयुक्तालयात नागपाडा पोलीस ठाणे येथे संतोष पांडुरंग जाधव (४०) राहणार नागपाडा येथे या हरवलेल्या व्यक्तीबद्दल रजिस्टर नोंद क्रमांक ४०/२०२० यानुसार तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय गाडगीळ, नागपाडा पोलीस ठाणेचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश मांजरेकर, पोलीस उप निरीक्षक एकनाथ देसाई, बी. डी. जाधव, अनिल शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पाटील, कांबळे, जाधव आणि बोडके यांनी यासंदर्भात शनिवारी, दिनांक १२ सप्टेंबर २०२० रोजी दोन आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान दोन आरोपींनी सदर हरवलेली व्यक्ती संतोष जाधव यांच्या खुनाचा कट रचून त्याचा खून करून भिवंडी येथील जंगलात प्रेत जमिनीत पुरून ठेवल्याचे निष्पन्न चौकशी दरम्यान स्पष्ट झाले.
त्या चौकशीनुसार प्रेताचा शोध घेण्यात आला. भिवंडी येथील जंगलात संतोष जाधव याचे प्रेत मिळून आल्याने नागपाडा पोलीस ठाण्यात सदर दोन आरोपींविरुद्ध गु. र. क्र. ४६७/२०२० कलम ३०२, २०१, १२० (ब), ३४ भा. द. वि. सह ३७ (१) १३५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना न्यायालयात समक्ष रिमांडकामी हजर केले गेले. न्यायालयाने त्या आरोपींना शनिवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण व गुन्हे प्रकटीकरण पथक करीत आहेत.







