पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव भाजपातर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – आज (दि. १७) मंडळ क्र-1 तर्फे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, त्यानिमित्त जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, भाजपचे महानगर अध्यक्ष दिपकभाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुलभ शौचालय व स्नान गृह लोकार्पण कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी, आमदार राजूमामा भोळे, भाजप महानगर अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष रमेश भाऊ जोगी यांच्या नेतृत्वाखाली धनाजी काळे नगर नगरसेवक श्री नवनाथ भाऊ दारकुंडे यांच्या घराजवळ शिवाजी नगर जळगाव येथेवृक्षा रोपण व सुलभ शौचालय व स्नानगृह लोकार्पण करण्यात आले, यावेळी मंडळातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी माननीय आमदार राजूमामा भोळे व जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी मण्डल अध्यक्ष रमेश भाऊ जोगी नगरसेवक, राजूभाऊ मराठी, नवनाथ भाऊ दारकुंडे ,सौ गायत्री शिंदे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष लताताई बाविस्कर महिला आघाडी अध्यक्ष ज्योतीताई राजपूत सरचिटणीस शांताराम गावंडे संजय शिंपी युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश भाऊ पुरोहित युवा मोर्चा मंडळ सरचिटणीस विनय चौधरी व उत्तम शिंदे, मधुकर मांढरे, संजय अकोलकर , पिंटू शिंदे ,संजय सणस ,बाळा साळुंके ,स्वप्निल भंडारकर ,सुनील शिंदे बाबाजी आदि कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here