नवी मुंबई (प्रतिनिधी गणेश पाटील) – गुरुवारी (दि 17) नवी मुंबई आरटीओ नाका बंदीदरम्यान मोटार वाहन निरीक्षक नवी मुंबई राहुल गावडे हे कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियनमार्फत त्यांच्या संपूर्ण टीमला कोरोना योद्धा सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातून तेथे सुद्धा कोरोना रुग्ण आढळल्याचा फोन आला. त्यामुळे त्यांनी पोलीस बॉईज संघटनेला गुन्हा अन्वेषण विभागात सॅनिटायझर औषध फवारणी करण्याची विनंती केली. त्यानुसार संपूर्ण गुन्हे अन्वेषण विभाग व वाहतूक विभाग ठाणे येथे मोफत औषध सॅनिटायझर फवारणी करण्यात आली








