अखेर नगरसेवक योगेशभाऊ महाजन यांचा प्रयत्नांना यश

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – एरंडोल येथील नगरसेवक तथा प्रदेश सचिव युवक कॉंग्रेस योगेश युवराज महाजन यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी दिनांक 07/09/2020 रोजी प्रांताअधिकारीव जिल्हाअधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेवून अष्टविनायक हॉस्पिटल येथे महात्मा ड़ुले जन आरोग्य योजना लागू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते.
कोविड -19 पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करत असताना होणारा खर्च गोरगरीब रुग्णांना परवडत नसल्याने एरंडोल येथील अष्टविनायक कोविड -19 हॉस्पिटल धरणगाव रोड येथे महात्मा फुले जन -आरोग्य योजना लागू करावी ह्या मागणीची दखल घेत एरंडोल प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी ही योजना अष्टविनायक कोविड-19 हॉस्पिटलला लागू करण्यात आल्याचे पत्र योगेश महाजन यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here