नाशिक (विशेष प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे व पोलिस भरती रद्द करावी. या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून नाशकातील सिडको भागात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भुजबळ हे कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेले होते.
मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी, जोपर्यत आरक्षण जाहीर केले जात नाही तोपर्यंत पोलिस भरती करू नये, शिवस्मारक तात्काळ उभे करा, कोपर्डी भगिनींना न्याय दया यासह मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलन ठिकाणी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. दरम्यान, भुजबळ हे त्रिंबकेश्वर येथे कार्यक्रमांसाठी गेले आहेत. कार्यक्रमावरून आल्यानंतर आंदोलनकर्ते भुजबळ यांना भेटून निवेदन देणार आहेत.







