सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – लेह – लडाख सीमेवर कर्तव्य बजावत असताना दुसाळे (ता. पाटण) येथील वीर जवान सचिन संभाजी जाधव (वय ३८ वर्ष) हे शहीद झाले आहेत.
सचिन हे १११ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये (नाईक) या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ही बातमी गावात पसरताच जाधव कुटुंब व दुसाळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. शहीद सचिन यांचे वडील संभाजी जाधव मेजर सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत. तर सध्या भाऊही देशसेवा बजावत आहेत. आज रात्री शहीद जवान जाधव यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणले जाणार आहे.







