जळगाव जिल्ह्यात ८०१ कोरोनाबाधितांनी केली कोरोनावर मात

आज आढळले ७०३ कोरोनाबाधित तर १८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१८) सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ७०३ कोरोनाबाधित आढळले असून, जळगाव शहरासह चोपडा, जामनेर आणि अमळनेर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम आहे. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ८०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
आज आढळलेल्या ७०३ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-१०३, जळगाव ग्रामीण-२५, भुसावळ-४९, अमळनेर-७०, चोपडा-९९, पाचोरा-३०, भडगाव-२०, धरणगाव-२७, यावल-१४, एरंडोल-६५, जामनेर-९३, रावेर-१५, पारोळा-८, चाळीसगाव-२७, मुक्ताईनगर-२२, बोदवड-३२ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ४ असा समावेश आहे.
आज आढळलेल्या ७०३ कोरोनाबाधितांनंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२ हजार ५५९ झाली असून, यातील ३१ हजार ५०३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान आज १८ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०६१ इतका झालेला आहे. सद्यस्थितीत ९ हजार ९९५ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here