मुंबई (जॉनी वाझ) – टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड असलेली अंकिता त्याच्या कुटंबियांच्या समर्थनार्थ उभी राहिली आणि सातत्याने त्याच्यासाठी न्याय मागत आहे. आता अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अंकिताच्या वडिलांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीवरआपल्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे ज्यात ते रुग्णालयात बेडवर दिसत आहेत. हा फोटो शेअर करतअभिनेत्रीने ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे तसेच ‘लवकर बरे व्हा पापा’ असे म्हटले आहे. अंकिता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते आणि ती नेहमी तिच्याशी संबंधित पोस्ट टाकत असते.
काही दिवसांपूर्वीच अंकिताला आपल्या चाहत्यांच्या रागाला बळी पडावे लागले होते. अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर केला होता यात तिने पिवळ्या रंगाचा पायजमा आणि निळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. या फोटोवरून चाहत्यांनी तिच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली होती. कारण तिच्या पायजम्यावर ‘ॐ’ लिहिले होते. फॅन्सचे म्हणणे होते की ‘ॐ’ लिहिलेला पायजमा तिने घालायला नको होता. 
अंकिताने २००९मध्ये एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेत काम करण्यास सुरूवात केली होती आणि या मालिकेत तिने अर्चनाची भूमिका साकारली होती. यामालिकेत तिच्या भूमिकेला मोठी पसंती मिळाली होती आणि त्यातून तिने आपली एक ओळख बनवली होती. या मालिकेत ती सुशांत सिंह राजपूतची हिरोईन होती. यानंतर अंकिताने कॉमेडी सर्कस, एक थी नायका आणि झलक दिखला जामध्ये काम केले. आता अंकिताने बॉलिवूडमध्येही आपले पाय ठेवले आहेत. ती कंगना राणावतसोबत मणिकर्णिका या सिनेमात दिसली होती. लवकरच ती बागी ३ या सिनेमात दिसणार आहे.







