अखेर वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या आंदोलनाला भरघोस यश

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – सोमवार दि. 7 सप्टेंबर 2020 रोजी वर्धा जिल्हा मुख्याध्यापक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन, जूनी पेन्शन हक्क संघटन, महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघ, प्रजासत्ताक शिक्षक संघ व खाजगी माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा समोर सारी सर्व्हेक्षणातील 2 महिन्यांपासून सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षक / शिक्षिका यांना कार्यमुक्त करण्यासाठी आंदोलन केले होते.
या आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी अतिसंवेदनशील भागात सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या 40 शिक्षिकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर उर्वरित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी समन्वय समितीने प्रतिदिन अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून उर्वरित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याला आज शुक्रवार दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी यश प्राप्त झाले असून सारी सर्व्हेक्षणातील उर्वरित सर्व शिक्षक / शिक्षिकांना आज कार्यमुक्त करण्यात आले.
गेल्या 3 महिन्यांपासून जे नोडल अधिकारी कार्यरत आहे त्यांना प्रशासनाकडून कार्यमुक्त करून घेण्यासाठी वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समितीचे कसोशीने प्रयत्न सुरू आहे. हे यश मिळविण्यासाठी प्रामुख्याने वरील संघटनांचे सतीश जगताप, जयप्रकाश थोटे, महेंद्र सालंकार, प्रमोद खोडे, सागर मसराम, रितेश निमसडे, अजय वानखेडे, प्रवीण भोयर, चंद्रकांत ठाकरे, सुरेश रोठे, मनीषा साळवे, सुरेशकुमार बरे, पदमा तायडे, अरुणकुमार हर्षबोधी यांनी व समन्वय समितीत सहभागी सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सदर आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शिक्षक/ शिक्षिका यांनी समन्वय समितीवर जो विश्वास दाखविला त्या विश्वासाचे व सर्वांचे हे यश आहे, त्याबद्दल वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समिती आपले सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here