मुंबई – देशातील ७० टक्के भागात निर्धारित वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला असून, आतापर्यंत १९१ जिल्ह्यात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. १ ते २२ जून या कालावधीत महाराष्ट्रात ४९ टक्के पावसाची नोंद झाली असून, मिलीमीटरमध्ये ही नोंद १९३.८ इतकी आहे
मान्सूनने देशाच्या ७० टक्के भाग व्यापला आहे. दक्षिण आणि पूर्वोत्तर राज्यांनंतर मान्सून आता मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशात सक्रीय झाला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहारमध्ये सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ६० टक्के अधिक पाऊस झाला आहे. १ जून ते २३ जून या काळात देशातील ६८१ जिल्ह्यांपैकी २८ टक्के म्हणजे १९१ टक्के जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. २३ टक्के जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत २० ते ५९ टक्के पाऊस झाला. मध्य प्रदेशासह पूर्व उत्तर प्रदेशात मान्सून एक आठवड्यापूर्वी दाखल झाला आहे.







