सुशांतचा मृत्यू श्वास घुटमळल्यानेच; फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट मुंबई पोलिसांच्या ताब्यात.

मुंबई (हितेश मिस्त्री) – सुशांत सिंह राजपूतचा अंतिम पोस्‍टमार्टम रिपोर्ट मुंबई पोलिसांकडे आला आहे. रिपोर्ट्नुसार, सुशांतचा मृत्यू फाशी लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच डॉक्टरांच्या टीमने पोस्टमार्टम रिपोर्टचे विश्लेषण केले आहे. पोस्‍टमार्टम रिपोर्टमध्ये सुशांतचा मृत्यू Aspecia Due To Hanging असे सांगितले आहे. ‘व्हिसेरा’देखील राखून ठेवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याआधी जो प्रोव्हिजनल पोस्टमार्टम रिपोर्ट होता, तो तीन डॉक्टरांकडून आला होता. आता फायनल रिपोर्ट पाच डॉक्टरांनी दिला आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सुशांतच्या शरिरावर कुठल्याही प्रकारची बाह्य जखम नव्हती. त्याची नखेदेखील एकदम स्वच्छ होती. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूचे कारण ‘आत्महत्या’ असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here