शहादा (विजय निकम) – आज शहादा येथे कांदा निर्यात बंदी उठविणे बाबत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.केंद्रात भाजपचे सरकार आहे व या सरकारने कांद्याचे भाव वाढले म्हणून निर्यातबंदी केली आहे व या निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना होऊ नये म्हणून तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
केंद्रात भाजप प्रणित सरकार असल्याकारणाने डिझेल व पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत तसेच शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.जर कांदा निर्यातबंदी लवकरात लवकर उठवली नाही तर राष्ट्रवादी पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल माळी, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल राजेंद्र वाघ, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर ,शहर युवक अध्यक्ष जगदीश माळी ,शुभम कुवर, माधवराव पंडित पाटील ,रविंद्र मुसळदे, इक्बाल शेख, समाधान देसले ,आकाश पिंपळे व इतर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Home उत्तर महाराष्ट्र शहादा कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन







