कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – आज (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिरजेतील मूक- बधिर शाळा येथे कै. सागर आवटी नॉन कोविड (डे केअर) हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले.
सां.मि आणि कुपवाड महानगरपालिका ,मा. सुरेश(बापू)आवटी युवा मंच व अपंग पूनर्वसन संस्था मिरज यांच्या संयोजनाने चालू केलेल्या कै. सागर आवटी नॉन कोविड (डे केअर) हॉस्पिटल चे उद्घाटन करण्यांत आले .
आयुक्त नितीन कापडणीस, महापौर गीताताई सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, दिनकरतात्या पाटील आणि सुरेश (बापू) आवटी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नसीमा नाईक (सभापती -महिला बाल कल्याण), नगरसेवक पांडुरंग कोरे ,गणेश माळी, गजेंद्र कुल्लोळी,डॉ. ताठे सर, डॉ. अक्षय पाटील आदीं प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास स्थायी समिती सभापती संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी ,बाबासाहेब आळतेकर, महेश पाटील, नितीन आवटी, सुनील मोतुगडे, पदमेश खोडकर, राकेश नेगांधी,शमाकांत आवटी ,वसीम पठाण, करण बनसोडे, शुभम शिंदे, सुरज शिंदे, इंगवले ,भास्कर बाळासाहेब अस्वले,फय्याज उगारे आदीं इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.







