वर्धा (विशेष प्रतिनिधी) – जागतिक महामारी कोरोना-१९ च्या अनुषंगाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करून शासनाने विद्यार्थ्यांना दूरदर्शन संगणक मोबाईल इत्यादी पद्धतीने ऑनलाईन शिक्षण देणे सुरू आहे. त्याचा फायदा जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे बाकी विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहे. शहरी व ग्रामीण तसेच श्रीमंत व गरीब अशी शिक्षणाची दरी निर्माण होईल.
शहरी भागातील पालक आपल्या पाल्यांना दूरदर्शन संगणक मोबाईल रिचार्ज ची व्यवस्था तसेच नेटवर्क पुरेश्या प्रमाणात शहरी भागात असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा काही प्रमाणात फायदा होतो.
ग्रामीण भागातील पालक परिस्थिती गरीब असल्यामुळे दूरदर्शन संगणक मोबाईल रिचार्ज नेटवर्क एकाच कुटुंबात एका पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण घेणारे असतील तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा फायदा होत नाही. डोंगरी भाग दुर्गम भागात नेटवर्क राहत नाही. त्यामुळे शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. दिल्लीला अभ्यासक्रम पूर्ण करतात किंवा नाही त्यातील चुका त्यांच्या निदर्शनास आणता येत नाही.ग्रामीण भागातील पालक ऑनलाइन शिक्षणामुळे पाल्यांना मार्गदर्शन करू शकत नाही.
मुक्ताबाई विद्यालय समुद्रपूर, तालुका -समुद्रपूर जिल्हा वर्धा. या शाळेतील सर्व शिक्षकांनी ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या मोबाईल द्वारा घरी भेटी देऊन समस्या सोडवितात.त्यामुळे आपल्यावर कोणाचातरी अंकुश असल्याने आदरयुक्त भीती मुलांच्या व पालकांच्या चेहर्यावर दिसत आहे. आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही. याची दक्षता घेतली जाते. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये येणाऱ्या अडचणी कित्येकदा चार भिंतीचे घर हे नशिबात नसते स्थलांतरित मजुरांच्या मुलांना त्यांचे आई-वडील गावी सोडून जातात आजी-आजोबा येते ते शिकलेले शिकलेले नसतील तर मुलांच्या गृहपाठात ते सहकार्य करू शकत नाही. शहरी व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी मोबाईलचा वापर पुरेशा प्रमाणात करू शकत नाही. आर्थिक दृष्ट्या ऑनलाईन शिक्षण पद्धती झेपणारी नाही. सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात त्यांचे निराकरण करताना बऱ्याच अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही उदाहरणार्थ शारीरिक ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. मोबाईल वरील अभ्यासक्रम करत असताना काही विद्यार्थी मोबाईलचा दुरुपयोग करू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना मोबाइलची व्यवस्था करू शकत नाही.
या परिस्थितीमध्ये कोरोना संकटाच्या काळात हा पर्याय योग्य वाटत नाही त्यामुळे गरीब व्यक्ती डिजिटली, गरीब असलेले कुटुंबातील मुली मागे पडू शकते.या ऑनलाईन वर्गाची मागणी जसजशी वाढत जाईल या व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांचे प्रस्थ वाढू लागेल.ऑनलाइन शिक्षण गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडणार नाही त्यांचे अल्प उत्पन्न असेल त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण घेताना अडथळे निर्माण होईल मुले स्वतः अभ्यासात स्वतःला गुंतवून पाहून नवीन छंद जोपासत मुलांना तरी आणखी काय हवे असते.
कोणाच्या महामारी संकटात ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण पद्धती अधिक प्रभावी करते त्याचा फायदा शहरी व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना होतो. आणखी मुलांना तरी काय हवे







