हिंदुविरोधकांचे सनातनला दोषी ठरवण्याचे षड्यंत्र पुन्हा विफल – सनातन संस्था

फोंडा (गोवा) – मडगाव स्फोट प्रकरणी सातत्याने काही हिंदुविरोधी शक्ती, तसेच पुरोगामी सनातन संस्थेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेल्या निर्णयाने सनातनला दोषी ठरवण्याचे षड्यंत्र विफल ठरले. या प्रकरणी ६ निष्पाप साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने केला होता. ४ वर्षे अकारण कारावास भोगल्यानंतर सत्र न्यायालयाने या सर्व साधकांना निर्दोष मुक्त केले होते. याविषयीच्या अपिलावर सुनावणी करतांना माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आम्ही न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करतो. भगव्या आतंकवादाच्या मिथकाचा प्रचार करणार्‍यांसाठी ही सणसणीत चपराक आहे, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here