भाजपा अमळनेरतर्फे विविध कार्यक्रम आयोजित

अमळनेर (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र तर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस ते पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांच्या जयंती पर्यंत सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
त्यात अमळनेर येते वृक्षारोपण कार्यक्रम गलवाडे रोड श्रद्धा नगर,पैलाड भवानी मंदिर परिसर, शिरूड नाका या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तसेच युवा मोर्चा च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 70 वा वाढदिवस असल्याने अमळनेर युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान करण्यात आले.
या प्रसंगी आमदार स्मिताताई वाघ शहराध्यक्ष उमेश वाल्हे, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,मार्केट सभापती प्रफुल्ल पवार,माजी जि प सदस्य अॅड. व्हि आर पाटील,माजी सभापती श्याम अहिरे, सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील,बबलू राजपूत,राहुल पाटील,कु.उ.बा.संचालक पराग पाटील,शहर उपाध्यक्ष महेंद्र महाजन, राहुल पाटील,श्रीनिवास मोरे,माजी शहराध्यक्ष शितल देशमुख,महेंद्र बोरसे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शिवाजी राजपूत,योगीराज चव्हाण,पंकज भोई,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here