आमदार राजेश पाडवी यांच्यातर्फे अपंगांना साहित्य वाटप

शहादा (विजय निकम) – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताह म्हणून अपंगांना साहित्य वाटप आज आमदार कार्यालय येथे शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार राजेश पाडवी व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व गटनेते मकरंद पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की या निमित्ताने समाजातील गोरगरीब जनतेच्या सेवा करण्याची संधी चालुन आली आहे गरजु अपंगत्व असलेल्या लोकांना साहित्य देऊन त्यांना जगन्याची आशा निर्माण करुन देणे तसेच आणखी काही लोकांना चष्मे उपलब्ध करून दिले. असे सेवा कार्य नेहमी घडत राहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी गटनेते मकरंद पाटील सर, अदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांतजी वसावे, शहर अध्यक्ष विनोद जैन, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे, शहर उपाध्यक्ष पंकज सोनार, माजी शहर अध्यक्ष अतुल जयस्वाल, महामंत्री हितेंद्र वर्मा, वैभव सोनार,अदिवासी मोर्चा शहर अध्यक्ष झुलाल मालचे, गुड्डू वळवी, नजमोदिन खाटीक उपस्थित होते सुत्र संचालन तालुका चिटणीस निलेश मराठे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here