बहिष्कृत व उपेक्षितांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत – माजी राष्ट्रपती डॉ.सौ.प्रतिभाताई पाटील

पुणे (विशेष प्रतिनिधी) – आदिवासी पारधी समाजाचे लोक एकंदरीत वंचित , शोषित आणि कष्टमय , अडी-अडचणीशी सामना करीत जीवन जगत आहेत.त्यातुन गरीबी आणि अज्ञान, असलेले आदिवासी पारधी समाजातील लोक जीवन जगत आहेत, अशा बहिष्कृत आणि उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत भारताच्या माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
आज आदिवासी पारधी समाजातील महिलांचे जीवन तर पशुपेक्षा अत्यंत वाईट आहे.याचे चित्रण परखडपणे आपल्या साध्या सोप्या पद्धतीने ” मराशी ” या पारधी बोली भाषेमध्ये रेखाटन करून लिखाण करण्यासाठी आदिवासी पारधी समाजातील आदिवासी समाजसेवक श्री. नामदेव भोसले यांनी केला आहे .ही निश्चितच स्तुत्य बाब आहे. मराशी हे पुस्तक वाचल्यानंतर अंगावर काटे उभे राहतात. विशेषत: अंधश्रद्धा , कुप्रथा , जालीम चालीरीती, कठोर रूढी परंपरा, या मुळे महिलांचे जीवन म्हणजे हा एक शाप आहे असे या महिलांना वाटत असेल, तर या मध्ये सुधारणा व्हावी म्हणून आदिवासी पारधी समाज सेवक आणि साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले सदैव अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्यांनी आत्ता पर्यंत महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाजातील लोकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मदत केली आहे‌. तसेच आदिवासी पारधी अनेक लोकांना या अनिष्ट रूढी परंपरा मधुन बाहेर काढले आहे, परंतु एकून आदिवासी पारधी समाजाला व त्या महिलांना भगिनींना यातुन बाहेर काढण्यासाठी त्यांच्या भाषेत त्यांना जनलोक शिक्षण देऊन शिक्षीत करण्याची फार मोठी गरज आहे.पारधी भाषा, त्यांची संस्कृती हजारो वर्षाची रामायण काळातली असली तरी आजच्या युगाची त्यांची ही दैन्यावस्था आधुनिक भारताला काळीमा फासणारी आहे.
सर्व मान्यवर विचारवंतानी, सरकारने व सामाजिक संस्थांनी आणि समाजसेवकांनी, कार्यकर्त्यांनी यात लक्ष घालून सुधारणा केली पाहिजे. आदिवासी समाज सेवक, साहित्यिक नामदेव भोसले यांनीआपल्या पध्दतीने यात बदल घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसे पाहिले तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपली लिखीत पुस्तके विक्री करुन , शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.श्री.नामदेव भोसले यांनी गेली २० वर्षे आदिवासी पारधी समाजातील अनिष्ट रुढी परंपरा दूर करुन आदिवासी पारधी समाजातील लोकांना गावामध्ये न्याय मिळवून दिला आहे. तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नामदेव भोसले यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांचे अभिनंदन करण्यासारखे त्यांचे सामाजिक कार्य आहे, परंतु हे कार्य त्यांचे एकट्याचे नसून त्यांच्या निस्वार्थ कार्याला सरकारने , शासकीय अधिकारी ,उद्योजक वर्ग, सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळुन आदिवासी पारधी समाजातील लोकांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी नामदेव भोसले यांना सहकार्य करावे.
जिद्द आणि चिकाटीने आज सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजसेवक नामदेव भोसले घरा घरात पोहचले आहेत. जो मुलगा लहानपणी आपल्या गरीब परिस्थितीमुळे नववी पर्यंतच्या शिक्षणासाठी चौदा वेळा शाळा बदलतो आणि पोटाची खळगी भरण्यासाठी सेहच्याळीस गावे फिरून भिक्षा मागून लहानाचा मोठा होतो तोच नामदेव भोसले आपल्या निस्वार्थ सामाजिक कार्यामुळे थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे हे नसे थोडके! तसेच भारताच्या माजी राष्ट्रपती डॉ.सौ. प्रतिभाताई पाटील यांची साहित्यिक नामदेव भोसले यांच्या मराशी या पुस्तकाला प्रस्तावना मिळाली. विशेषतः भारताच्या माजी राष्ट्रपती डॉ.सौ.प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना दर महिन्याला मिळणाऱ्या वेतनातून अर्धे वेतन नामदेव भोसले यांना दिले, आणि साहित्यिक नामदेव भोसले यांच्या कौतुकास्पद सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले. त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे यांनी साहित्यिक नामदेव भोसले यांचे मनःपुर्वक अभिनंदन केले.तसेच सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी साहित्यिक नामदेव भोसले यांना मनःपुर्वक हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here