पुणे (प्रतिनिधी) | आभार फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवरुप अनिलशेठ तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिद्राराममळा येथे विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च, हार-तुरे आणि सत्कार टाळून थेट पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिल्याबद्दल त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिद्राराममळा परिसरात सीताफळाच्या ६० वृक्षांच्या रोपणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित शाळकरी मुलांनी “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणा देत संपूर्ण परिसर प्रसन्नमय करून सोडला. पर्यावरणाचा संवर्धन संदेश देत विद्यार्थ्यांनी ही रोपे जोपासण्याचा संकल्प केला.
वृक्षारोपणासोबतच परिसरातील अंगणवाडी सिद्रामराम मळा आणि अंगणवाडी कोळपे वस्ती येथील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद या उपक्रमाची पावती ठरला.







