११ जणांनी १९ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

मोगादिसू (सोमालिया)- सोमालिया देशातील मोगादिसू येथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशात उग्र रुप धारण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन खाली फेकण्यात आलं. ज्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच प्रकरणी संपूर्ण सोमालियात आता प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. जवळजवळ ११ नराधमांनी या तरुणीवर बलात्कार केल्याचं आता समोर आलं आहे. त्यानंतर त्यांनी तिला सहाव्या मजल्यावरून खाली देखील फेकून दिलं. आरोपींनी सुरुवातीला तरुणीला असं सांगितलं की, ते तिच्या प्रियकराशी भेट करुन देतील. त्यामुळे तरुणी देखील विश्वास ठेऊन या लोकांसोबत गेली. पण आरोपींनी तरुणीला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या देखील केली.
या घटनेत सामील असलेल्या सर्व ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आता पोलीस या आरोपींची नेमकी पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पीडित तरुणी ही कॉलेजमध्ये शिकत होती. जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा सोमालियामध्ये देशव्यापी विरोध प्रदर्शन आणि आंदोलनं सुरु झाली. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून इतरही काही संशयित आरोपीचा शोध सुरु आहे. दरम्यान, सोमालिया पोलिसांवर दबाव वाढत असून आरोपींना कठोर शिक्षेचा मागणी केली जात आहे.
स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणी ही लंचनंतर आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर काही वेळाने तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोनवरून माहिती मिळाली की त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. सोमालियाच्या सरकारने याबाबत असं म्हटलं आहे की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि आरोपींवर कारवाई करण्यात कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. दरम्यान, येथील एका खासदाराने असं म्हटलं आहे की, ‘जोवर पीडित तरुणीला न्याय मिळणार नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here