मुक्ताबाई विद्यालय येथील कलाशिक्षक यांना समाज गौरव व कला गौरव पुरस्कार सन्मानित

समुद्रपूर (जिल्हा वर्धा) (प्रतिनिधी) – स्थानिक रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित, मुक्ताबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय समुद्रपूर येथील कलाशिक्षक मनोज भाऊराव बाचले यांना सोम्या फिल्म आणि रहीकवार ब्रदर्सच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्टार महाराष्ट्र पुरस्कार, सत्र- 2020 मध्ये या कार्यक्रमात यांना समाज गौरव व कलागौरव पुरस्कार सौम्या ब्रदर्सचे डायरेक्टर श्री गणेश रहीकवार यांच्या वतीने समाज गौरव व कलागौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाळेतील कला शिक्षक यांनी गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन जीवनामध्ये आपले कार्य आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांचा जोपासले आहे. तसेच आपल्या अंगी असणाऱ्या या कलागुणामुळे समाजात एक विशिष्ट स्थान त्यांनी निर्माण केले असून त्यांनी आपल्या 14 वर्षाच्या कार्यामध्ये सामाजिक, राजकीय औद्योगिक, संस्कृती संघटनात्मक, शैक्षणीक, कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण वन्य जीव संरक्षण इत्यादी अध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलेले उल्लेखनीय कार्य आहे. त्यामुळे या सर्व कार्याची दखल घेत ऑनलाइन पुरस्कार यांना हे सन्मानपत्र व पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
श्री फिल्म इंडस्ट्रीज प्रोडक्ट डायरेक्टर गणेश रहीकवार यांनी यापुढे ही आपली कारकिर्द अशीच बहरत राहो. यासाठी सोम्या फिल्म आणि रेहीकवार ब्रदर्स फिल्म प्रोडक्शन यांच्यावतीने मनोज भाऊराव बाचले यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. सुधाकरराव घोडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना शिंदे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक, प्रशांत पांढरे, शरद वांढरे, विनोद इंगळे, सुनील धुडे, एकनाथ तपासे, गजानन कडू, श्रीराम येणूरकर, किशोर आडे, सुहास शिरपूरकर, कु. साधना पवार, कु. सुनीता गजभिये, कु. छाया हागे, कु. उज्वला बुचे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here