चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा सप्ताहा अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे व इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित आसकरण ताराचंद जैन रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न झाले.
कोरोना महामारीचा काळात सध्या देशात भयंकर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या सेवा सप्ताहा अंतर्गत शिबिर घेण्यात आले.कोरोना काळाचे भान ठेवून प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटाईज करुन सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन रक्तदात्यास रक्तदानासाठी आत सोडण्यात आले.शिबीराप्रसंगी ओबीसी सेलचे विभाग प्रमुख प्रदिप पाटील,भाजपा जिल्हा चिटणीस राकेश पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल जि.प सदस्य गजेंद्र सोनवणे,माजी शहराध्यक्ष राजू शर्मा,मगन बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुका उपाध्यक्ष देविदास पाटील,भारती क्षिरसागर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष तुषार पाठक,सरचिटणीस मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे,कांतीलाल पाटील , विवेक गुजर,विकास शिंदे,जिल्हा संवाद रॅली संयोजक भरत सोनगिरे,पिंटू पावरा,दिव्यांग आघाडी जिल्हा सरचिटणीस शेखर ठाकरे,कमलेश चौधरी, उपाध्यक्ष गोपाल पाटील,प्रविण चौधरी,व्यापारी आघाडी अध्यक्ष हेमंतसिंग जोहरी,यूवा मोर्चा सरचिटणीस भुषण महाजन, रितेश शिंपी,अमित तडवी, कैलास पाटील,विजय बाविस्कर, भरत पाटिल(मितावली),दिपक बाविस्कर, जिवन पाटील, भगवान पाटील( चांदसणी), बळीराम बारेला व कार्यालय मंत्री मोहित भावे यांची उपस्थिति होती.








