राज्यातील 60हजार विना अनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा विषय
वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – १६ सप्टेंबर रोजी शासनाने माध्यमिक शाळेचा पाचवा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणे बाबतचा व विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी नियमबाह्यपणे कृती समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला या दोन्ही शासन निर्णयाची जिल्हा परिषद ,वर्धा समोर कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे नागपूर विभाग सचिव अजय भोयर यांचे नेतृत्वात होळी करून निषेध करण्यात आला व तसे निवेदन शिक्षणाधिकारी मार्फत शिक्षण मंत्री व त्रुटी समितीचे अध्यक्ष यांना पाठविण्यात आले.
दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजी च्या शासन निर्णयान्वये त्रृटी समिती गठीत करण्यात आलेली आहे. विनाअनुदानित शाळांना अनुदानासाठी पात्र घोषित करून शासन निर्णय 15 नोव्हेंबर 2011 अन्वये अनुदान न देता सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचा अन्यायकारक निर्णय शासनाने घेतला .त्याच आधारावर शासन निर्णय दिनांक 13 सप्टेंबर 2019 निर्गमित करण्यात आला ,परंतु या शासन निर्णयान्वये अनुदानासाठी पात्र घोषित शाळांना 20 टक्के वेतन अनुदान व 20 टक्के अनुदान उपलब्ध करून दिलेल्या शाळांना नियमानुसार वाढीव टप्पा वितरित करण्यात आलेला नाही.त्यामुळे राज्यातील जवळपास 60हजार विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. अनुदान देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्याकरीता दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजी त्रृटी समिती स्थापित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे असा आरोप निवेदनातुन करण्यात आला, म्हणून त्रुटी समितीच्या शासन निर्णयाची होळी करून तीव्र निषेध करण्यातआला.
तसेच माध्यमिक शाळातील इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणे बाबतचा दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजीचा शासन निर्णय हा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील नियम क्रमांक 2 चा भंग करणारा आहे .त्यामुळे माध्यमिक शाळातील इयत्ता पाचवा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणे बाबतचा दिनांक 16 सप्टेंबर 2020 चा शासन निर्णय बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे, म्हणून ह्या शासन निर्णयाची होळी करून निषेध करण्यात आला.
तात्काळ 16 सप्टेंबर 2020 चे दोन्ही शासन निर्णय रद्द करावे अन्यथा राज्यभर आंदोलन उग्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी कृती समिती व म रा शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीचे मनिष मारोडकर, अमित प्रसाद, मुकेश इंगोले, विनयकुमार बरडे, कुंडलिक राठोड, रवी कोठेकर, संजय बारी, परमेश्वर केंन्द्रे, प्रदिप गुल्हाने, मंगेश धुर्वॅ, गोपिचंद ढोणे, धनराज कावटे, अनिल टोपले, अनंता पोराटे, मोहन गाडे, प्रशांत लिडबे, शैलेश भोसले, अजय ढांगे, किशोर साठवणकर, प्रशांत दुधाने, प्रदिप गोमासे, अविनाश धात्रक, प्रदिप महल्ले, प्रणोज बनकर, देवीदास गावंडे, नरेश कुटेमाटे, विनोद राऊत आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/1336522780012950/?t=0







