नवनियुक्त पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी पदभार स्वीकारला

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जिल्हा पोलीस डॉ. प्रविण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार घेतला. जिल्हा अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी नवनियुक्त पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांना पदभार सोपविला.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन,अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यासह पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ.मुंडे म्हणाले की, जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक राखण्याचे ध्येय असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य दिले जाईल. पोलीस प्रशासन हे जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी काम करेल, अशी ग्वाहीही त्यांनी शेवटी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here