सातारा (निवासी संपादक सोमनाथ जाधव) – पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर आणि माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांना योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झालं.. त्यानंतर मराठी पत्रकार परिषदेनं कोरोनाबाधित पत्रकारांसाठी सरकारनं प्रत्येक रूग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करावी अशी मागणी केली. काही जिल्हयात तशी व्यवस्था झाली असली तरी इतर अनेक जिल्ह्यात आजही पत्रकारांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच आपल्यासाठी काही केले पाहिजे थोडक्यात आत्मनिर्भर झाले पाहिजे अशी भूमिका मराठी पत्रकार परिषदेने घेतल्यानंतर अनेक जिल्ह्यात गरजू पत्रकारांसाठी जीनयवनावश्यक वस्तूंचे किट्स पत्रकारांना वाटण्यात आले, अनेक जिल्ह्यात पत्रकारांच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या आता सातारा जिल्हा पत्रकार संघाने तर एक पाऊल पुढे टाकत पत्रकारांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर सुरू करून आत्मनिर्भर पत्रकारच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे.
त्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचे आणि त्यांच्या सर्व टिमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे.. यापासून पत्रकार देखील अलिप्त राहिले नाहीत. काही पत्रकार बाधित झाले मात्र त्यातील अनेक पत्रकारांच्या घरी विलगीकरणाची सोय नसल्याने पत्रकारांसमोर अडचणी ऊभ्या राहत असल्याने जिल्हा पत्रकार संघाने पत्रकारांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर ऊभारणयाची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली.
या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन आज (दि.२२) झालं. यवतेश्वर परिसरात हॉटेल निवांत येथे हे केअर सेंटर सुरू केले गेले आहे. 16 बेडच्या या केअर सेंटरमध्ये 2 ऑक्सीजन मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.. आरोग्य विभागानं 1 डॉक्टर आणि 2 नर्सेसची व्यवस्था केली आहे.. नाश्ता, जेवणाची देखील उत्तम व्यवस्था येथे केली गेली आहे.. खा. ऊदयनराजे भोसले आणि उद्योजक सागर भोसले यांनी ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या पत्रकारांची घरी विलगीकरणाची सोय नाही अशा बाधित पत्रकारांची या केअर सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात येईल.
सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या या पथदर्शी प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील बाधित पत्रकारांना चांगले उपचार मिळणार आहेत.. शिवाय ऑक्सीजन देखील उपलब्ध होणार आहे.. आपल्या सदस्यांची काळजी घेणे हे कोणत्याही संघटनेचे काम असते.. सातारा जिल्हा पत्रकार संघाने हे दाखवून दिले आहे. याबद्दल अध्यक्ष हरिष पाटणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे परिसरातील पत्रकारांकडून आभार मानण्यात येत आहे.
Home पश्चिम महाराष्ट्र सातारा साताऱ्यातील पत्रकारांनी सुरू केले पत्रकारांसाठी राज्यातील पहिले कोरोना केअर सेंटर







