जळगाव (संपादक सुनिल पाटील) – नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तपदी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची नियुक्ती झाली. नवनियुक्त आयुक्त हिरालाल जी सोनवणे यांचे दक्ष पोलिस टाईम्सतर्फे स्वागत करण्यात आले.
नाशिक येथे त्यांचे स्वागत दक्ष पोलिस टाईम्सचे संस्थापक तथा सरपंच विजय टाटीया यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संपादक तथा नगरसेवक राकेश पाटील व संभाजी जाधव आदी उपस्थित होते.
श्री. सोनवणे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यांनी यापूर्वी नंदुरबार व शिरपूर येथे प्रांताधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी १२ ते १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले सुमारे तीन हजार ५०० दावे निकाली काढले. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर कार्यरत असताना श्री. सोनवणे यांनी पंतप्रधान घरकुल योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. सुमारे १६ हजार ५०० वनराई बंधारे बांधून त्यांनी जिल्ह्यातील धान व तांदूळ शेतीचे नुकसान झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविला. जिल्हा परिषद कर्मचारी व लोकसहभागातून सरकारचा निधी खर्च न करता हे काम श्री. सोनवणे यांनी केले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव नाशिक विभागीय आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांचे दक्ष पोलिस टाइम्स्तर्फे स्वागत







