नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे दक्ष पोलिस टाइम्सतर्फे स्वागत

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी रविवारी (ता. 20) रोजी सकाळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पदाचा कार्यभार स्वीकारला. या आधी ते मुंबई येथील राज्य राखीव दलात समादेशक म्हणून कार्यरत होते. त्यांचे दक्ष पोलिस टाइम्स्‌तर्फे स्वागत करण्यात आले.
यावेळी दक्ष पोलिस टाइम्सचे संपादक तथा सरपंच विजय टाटिया यांनी जैन समाजातील मोटीमाळा व दक्ष पोलिस टाईम्सचा अंक दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे भ्रष्ट पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन देऊन त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चादेखील केली. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संपादक तथा नगरसेवक राकेश पाटील उपस्थित होते.श्री पाटील यांनी २०११ मध्ये राज्यपालांचे एडीएस म्हणुन काम केले आहे. यांनतर २०१५ ला ठाणे शहर पोलीस उपायुक्त, २०१७ ला मुंबई पोलीस उपायुक्त तर २०१९ पासून आतापर्यंत मुंबई राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणुन कार्यरत होते. शनिवारी समादेशक पदाचा पदभार देऊन ते सायंकाळीच तात्काळ नाशिकला हजर झाले. रविवार असल्याने ते सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी रविवारी सकाळीच आडगाव मुख्यालय येथे हजर होत पदभार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here