‘त्या’ पार्टीत सोनाक्षी सिन्हादेखील होती उपस्थित

मुंबई (हितेश मिस्त्री) – सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी निगडित ड्रग्ज प्रकरणासंदर्भात दिवसेंदिवस नव्या गोष्टींचा उलगडा होत आहे. दीपिका पदुकोणच्या चॅटमध्ये ड्रग्जसंदर्भात कोको क्लबमध्ये भेटण्याबाबत चर्चा झाली होती. या दिवशी बॉलीवूडचे ४ मोठे कलाकार लोअर परेलच्या कोको क्लब येथे एका खासगी हॅलोवीन पार्टीसाठी जमले होते. अशी माहिती समोर आली आहे.
या पार्टीत दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हाही सहभागी झाले होते. दीपिकाच्या चॅटमधील शैल हे नाव सोनाक्षी सिन्हासाठी वापरले गेल्याचे मानले जात आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री दिया मिर्झा हिचे नाव ड्रग्ज पॅडलर अनुज केशवानीने दिलेल्या जबाबातून समोर आले आहे. दिया ही केशवानीकडून ड्रग्ज खरेदी करत होती. याबाबतचे पुरावेही एनसीबीकडे उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे मी आयुष्यात कधीही ड्रग्ज घेतलेले नाही, असे दियाने म्हटले आहे. श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांचीही नावे समोर आली आहेत.
दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यात ड्रग्जवरून झालेला संवाद नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) विभागाच्या हाती लागला आहे. या पार्श्वभूमीवर मॅनेजर करिश्माला चौकशीसाठी एनसीबीने बोलावले असून दीपिका पदुकोणलाही चौकशीसाठी लवकरच बोलवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुशांतची प्रेमिका रिया चक्रवर्ती हिने चौकशीत श्रद्धा आणि साराची नावे घेतली आहेत. दुसरीकडे, रिया हिची मॅनेजर जया साहा हिची सोमवारी चौकशी झाली. तिच्यासह व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर ‘डी’ आणि ‘के’ नावाने ड्रग्जसंदर्भात बोलणे झाल्याचे समोर आले आहे. ‘डी’ नावाने बोलणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण असल्याचे मानण्यात येत असून, ‘के’ नावाने २००० मधील आघाडीची अभिनेत्री बोलत असल्याचे समजले जात आहे. ‘डी’ला काहीही करून ‘माल’ (ड्रग्ज) हवा आहे… आणि ‘के’ तिच्यासाठी त्याची तजवीज करणार आहे, असे या संवादातून समोर आलेले आहे. ऑक्टोबर २०१७ मधील हा संवाद आहे.
दीपिकासह सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांनाही एनसीबीकडून समन्स बजावण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती हिने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात २५ सेलिब्रिटजची नावे समोर आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here