न्यूड होऊन योगासने करणारी नताशा नोएल सोशल मिडीयावर होतेय लोकप्रिय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मुंबईत राहणारी २६ वर्षांची नताशा नोएल अनोख्या पद्धतीने योगासने करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती कधी बिकिनीत तर कधी न्यूड योगासने करते. या पद्धतीने योगासने करतानाचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवर सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे.
नताशा नोएलचे इन्स्टाग्राम अकाउंट बिकिनीतील तसेच न्यूड योगासनांच्या अनेक फोटो आणि व्हिडीओंनी भरलेले आहे. नताशाला अनोख्या पद्धतीने योगासने करुन त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याचे वेड लागले आहे. या फोटो आणि व्हिडीओंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नताशाचा उत्साह आणखी वाढला आहे.
योगासनांच्या फोटो आणि व्हिडीओसोबतच नताशा अनेक टिप्स देते. ती योगासने करण्यासाठी तसेच फिटनेस राखण्यासाठी देत असलेल्या टिप्स अनेकजण आवर्जून फॉलो करतात. नताशाने अल्पावधीत सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर अडीच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. नताशाने अल्पावधीतच असे अनेक योगासनांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत जी योगासने करणे भल्याभल्यांना कठीण जाते.नताशाचे योगासने करतानाचे बिकिनीतले तसेच न्यूड फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेकजण चक्रावले आहेत. अनेकांना तिचे फोटो आणि व्हिडीओ नियमित बघण्याचे तसेच तिच्याकडून टिप्स घेण्याचे वेड लागले आहे.
नताशा म्हणते जिथे कुठे तिचे मन लागते तिथे ती सुरू होते. नताशाने अतिशय अरूंद जागेत भन्नाट योगासने केली आहेत. या योगासनांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्यासारखी योगासने करणे अनेकांसाठी खूप कठीण आहे. नताशाचे शरीर अतिशय लवचिक आहे. यामुळे ती कोणत्याही पद्धतीची योगासने सहजरित्या करू शकते. शरीराला हवे तसे वळवणे तिला सहज जमते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here