कचरा वाहतूक कामगारांचे सामूहिक रजा आंदोलन

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबई महानगर पालिका घनकचरा विभागातील कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने सोमवारी निचरा वाहतूक करणाऱ्या कामगारांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना किमान वेतन थकबाकी मिळावी. कामगारांना देण्यात आले थकबाकीची रक्कम कमी असून उर्वरित रक्कम परत मिळावी. कामगारांना दरमहा सात तारखेच्या आत मिळावे.कचरा वाहतुकीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने नादुरुस्त असल्यामुळे काम करताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत.ही सर्व वाहने त्वरित दुरुस्त करावी.अशा विविधी मागण्यांसाठ सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी कचरा वाहतूक कामगारांनी सामूहिक रजा आंदोलन केले आहे.
त्यामुळे कामगारांच्या मागण्या बाबत महानगरपालिका प्रशासन जोपर्यंत सकारात्मक निर्णय घेणार नाही. तोपर्यंत सामूहिक रजा आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे समाज समता कामगार संघाचे अध्यक्ष गजानन भोईर यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here