लोणी येथे शेतकरी संघटनेचे राख रांगोळी आंदोलन

नाशिक (विशेष प्रतिनिधी इजि.कुबेर जाधव) – केंद्र शासनाने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी उठवावी यासाठी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी, खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन जाहीर केले होते. लोणी येथे खासदार सुजय विखे यांच्या गावात शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

लोणी येथे शेतकरी संघटनेचे राख रांगोळी आंदोलन
खासदार भारतीताई पवार यांचे घरासमोर निदर्शने करतांना शेतकरी संघटना प्रांत उपाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हाध्यक्ष आर्जुन बोराडे तसेच कळवन तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, बागलान अध्यक्ष माणिकराव देवरे व इतर तालुक्यातील अध्यक्ष.

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकर्‍यांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकसभेत आवाज उठवावा व कांदा उत्पादक शेतकर्‍यांवरील अन्याय दुर कारावा. यासाठी खासदारंच्या दारात निर्यातबंदी आदेशाची जाळुन राख करणे कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन आज शेतकरी संघटनेने केले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे आंदोलक सुजय विखे यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना घराकडे जाण्यास मज्जाव केला. आंदोलकांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतुळ्यासमोर राखरांगोळी आंरदोलन पार पाडले.
शेतकर्‍यांनी निवडुन देलेले खासदार जर शेतकर्‍यंच्या प्रश्नासाठी लोकसभेत आवाज उठवणार नसतील तर शेतकरी पुन्हा निवडुन देणार नाहीत. जो पक्ष कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करेल व जो पक्ष कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी करेल अशा पक्षांना शेतकर्‍यांनी या पुढे मतदान करू नये असे आवाहन घनवट यांनी केले. कांद्याचे भाव पाडण्यासठी निर्यतबंदी व कांद्याची आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा शेतकरी संघटनेने निषेध केला.
या आंदोलनात उत्तर नगरचे संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब आढाव, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, अनिल भुजबळ, महादू खामकर, मधुकर शिंदे, नानासाहेब जाधव, निलेश शेडगे, जितेंद्र शहा, अंबादास चव्हाण, बन्सी इंगळे, दत्ता वाळुज, दत्तात्रय जाधव आदी कार्यकर्ते अंदोलनात सहभागी झाले.

लोणी येथे शेतकरी संघटनेचे राख रांगोळी आंदोलन

खासदार भारतीताई पवार यांचे घरासमोर निदर्शने करतांना शेतकरी संघटना प्रांत उपाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हाध्यक्ष आर्जुन बोराडे तसेच कळवन तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, बागलान अध्यक्ष माणिकराव देवरे व इतर तालुक्यातील अध्यक्ष.

Posted by Buland Police Times on Wednesday, September 23, 2020

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here