जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.२३) सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर ४४६ कोरोनाबाधित आढळून आले. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट ८०३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदरही कमी झाला असून, आज ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या ४४६ कोरोनाबाधितांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४५ हजार ४२९ झाली आहे. सर्वाधिक १४० रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर १४०, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ ५५, अमळनेर ११, चोपडा ५३, पाचोरा ७, भडगाव १४, धरणगाव २४, यावल ५, एरंडोल ५, जामनेर २२, रावेर ११, पारोळा १०, चाळीसगाव २८, मुक्ताईनगर १९, बोदवड ७ इतर जिल्ह्यातील ९ असा समावेश आहे.
आजवर कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ३५,१७८ इतकी झाली आहे. दरम्यान दिवसभरात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, यात भुसावळ, चोपडा, पाचोरा, यावल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ११२९ वर पोहचला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







