आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई रुग्णालयात दाखल

गुवाहाटी – काँग्रेस नेता आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना गुरूवारी गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मागील महिन्यातच त्यांनाकोरोनाची लागण झाली होती.
आसामचे काँग्रेस अध्यक्ष रीपून बोरा हे गोगोई यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. तसेच गोगोई यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना देखील केली.
दरम्यान, तरुण गोगोई 2016 मध्ये भाजप सत्तेत येण्यापूर्वी 15 वर्ष मुख्यमंत्री होते. आसाममध्ये 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सत्ता परत यावी यासाठी गोगोई मागील काही दिवसांपासून दौरा करत होते. त्यातच 26 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील आठवड्यात त्यांची पुन्हा टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here