लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना काश्मीर झोन पोलिसांनी आज सकाळी कंठस्नान घातले. दहशतवाद्यांकडील मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. संपूर्ण परिसर सील करून शोध मोहीम राबवली जात आहे.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गुरुवारपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी बिजबेहराच्या सिरहामा गावात लपलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. काश्मीर पोलिसांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात काश्मीर झोन पोलिसांना यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक उच्चस्तरीय कमांडर असून, तो गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here