चोपडा तालुका ओला दुष्काळ जाहिर करुन व शेतकर्‍यांना आर्थिक भरपाई देण्याची भाजपची मागणी

चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – गेल्या 15 ते 20 दिवसांपासून चोपडा तालुक्यात वादळं,अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कांदा,ज्वारी,मका,कापुस, सोयाबीन, मुग व उडीद,ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बंधु फार मोठ्या अस्मानी संकटात सापडला आहे.सर्व पिके कवडीमोल झालेली आहेत.त्यासाठी राज्य शासनाने त्वरीत पंचनाम्याचे आदेश देऊन चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा.तसेच शासनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत करावी.अन्यथा भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चोपडा कडून तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.अश्या आशयाचे निवेदन भाजप व भाजयुमो तर्फे तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
यावेळी पक्ष संघटनेचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा चिटणीस राकेश पाटील,शेतकी संघाचे संचालक हिंमतराव पाटील,कृ.उ.बा.समिती संचालक धनंजय पाटील,भरत पाटील,तापी सुतगिरणी संचालिका सौ.रंजना नेवे,तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकरे,सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुज,चंद्रकांत धनगर,जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे,युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक,सरचिटणीस अमोल पाटील,लक्ष्मण पाटील,उपाध्यक्ष प्रविण चौधरी,गोपाल चौधरी,विजय बाविस्कर,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष संजय श्रावगी,तेजस जैन,मोहित भावे सचिन धनगर,ज्ञानेश्वर चौधरी,आदि पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here