बोराडी येथे एकाच रात्री चार घरफोड्या

शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – दिनांक 25 रोजी शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात एकाच रात्री चार घरफोडी चोरट्यांनी चार तोडे सात ग्राम सोने व रोख 80 हजार रुपये केले लंपास, चोरी करताना इलेक्ट्रॉनिक कटर संशय. बोराडी गावातील बडगुजर गल्लीतील लीलाचद बडगुजर यांच्यात घरातून चार तोडे सात ग्राम सोने व रोख 80 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
गावातील बडगुजर गल्लीतील संतोष बडगुजर, गुलाब बडगुजर, यशवंत देसले यांच्या घरावरही चोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु या घरात काहीच नाही सापडल्यास असे सांगण्यात येत आहे. तर लिलाचद उखा बडगुजर हे परिवारासह घरात झोपले असताना घरात प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याची अंगठी, मंगलपोत, काण्यातील दागिने व लहान बाळाच्या सोन्याची अंगठी, चैन, कान्यातील बाळ्या असे एकूण चार तोडे सात ग्राम सोने चोरून नेले आहेत.
विशेष म्हणजे घराचे लोखंडी दरवाज्याची कळी तोडण्यासाठी इले्ट्रॉनिक्स कटरचा वापर करण्यात आले असल्याचे प्रथमतः दिसून येत आहे. त्यामुळे चोरांची मोठी टोळी असल्याचा संशयाने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना स्थळी माहिती मिळताच सांगवी पोलीचे स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक वारे, भुषण चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले. घटनास्थळी फोरेनिकस पथकाला पाचारण करण्यात आले. अज्ञात चोरट्याविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here