दीपिका पदुकोणवर पणाला लागले आहेत इंडस्ट्रीचे ६०० कोटी

मुंबई (उपसंपादक सुरेश पवार) – ड्रग्सप्रकरणी एनसीबी दीपिका पादुकोणची चौकशी करत आहे. ऑक्टोबर २०१७च्या कथित ड्रग चॅटमध्ये तिचे नाव समोर आले आहे. दीपिकावर इंडस्ट्रीचे ६०० कोटी रुपये पणाला लागले आहेत.
दीपिका पादुकोण आपल्या आगामी ‘83’ या चित्रपटात आपला पती रणवीर सिंह याच्यासोबत दिसणार आहे. यात ती कपिल देव यांची पत्नी रूमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. दीपिका या चित्रपटाची सहनिर्मातीही आहे. यानंतर दीपिका शकुन बत्राच्या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्याला सुरु होते जे सोडून दीपिका मुंबईला रवाना झाली. या चित्रपटाचे बजेट जवळपास ८० ते ९० कोटी रुपये इतके आहे.
दीपिका पादुकोण नाग अश्विन यांच्या चित्रपटातही काम करणार आहे. यात ती ‘बाहुबली’ फेम प्रभाससोबत दिसणार आहे. रिपोर्ट्सप्रमाणे ही एक सायन्स फिक्शन फिल्म असणार आहे ज्याचे बजेटही बरेच मोठे असणार आहे. याशिवाय दीपिका मधू मंतेनाच्या चित्रपटातही दिसणार आहे. हाती आलेल्या बातम्यांनुसार हा चित्रपट द्रौपदीच्या व्यक्तिरेखेवर आधारित असणार आहे. चित्रपटाचे बजेट साधारण २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दीपिकाशिवाय मधूही याप्रकरणी अडचणीत आली आहे.
दीपिका पादुकोणच्या कमाईतील एक मोठा भाग ब्रँड एंडॉर्समेंटद्वारेही येतो. सध्या दीपिकाकडे ३३ ब्रँड एंडॉर्समेंटचे डील आहे, ज्याची एकूण रक्कम ३०० कोटी रुपये इतकी आहे. तज्ञांच्या मते ड्रग्सप्रकरणी वाईट पब्लिसिटी झाल्याने यातील काही ब्रँड्स दीपिकाच्या हातातून जाऊ शकतात.
२०१५मध्ये आमिर खानच्या भारतातील असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर स्नॅपडीलवर बंदी घालण्याची मोहीम सुरू झाली होती ज्यानंतर स्नॅपडीलने आमिर खानला काढून टाकले होते. तर यावर्षी जेएनयूमध्ये गेल्याचा परिणाम दीपिकाच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या कमाईवरही झाला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here