कोरोना सर्वेक्षणाच्या कामांतून शिक्षकांना कार्यमुक्त करा

निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना व्ही . यु . डायगव्हाणे व विमाशी संघाचे पदाधिकारी.
  • विमाशी संघाचे नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन
  • माजी शिक्षक आमदार यांची चर्चा

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – ज्या शिक्षकांच्या सेवा कोरोनाच्या आजारासंबधीत कामकाजासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत . त्यांना कार्यमुक्त करण्यासाठी शासनाने संदर्भाकीत शासन परिपत्रक निर्गमीत केले आहे . शिक्षकांना कोरोनाच्या कामकाजातून कार्यमुक्त करुन विद्यार्थ्यांना आभासी पटलावर शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे शासनाचे आदेश असताना अजुनही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना सर्वेक्षणाचे काम करीत आहे . शासन परिपत्रकानुसार त्यांना तात्काळ कार्यमुक्त करा आणि जे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना सर्वेक्षणाच्या कर्तव्यावर असतांना दिवंगत झाले अशा कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांना तात्काळ ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे माजी शिक्षक आमदार व्ही . यु . डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) अनिल गोतमारे , नागपूर शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे यांच्या उपस्थितीत सोमवार २८ सप्टेंबर रोजी नागपूरचे निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांना देण्यात आले .
कोवीड आजाराचे सर्वेक्षण करण्यासाठी शाळांतील शिक्षकाच्या सेवा मुख्याध्यापक किंवा व्यवस्थापनाला कोणतीही सूचना न देता अधिग्रहित करण्यात आलेल्या आहे. २४ जूनच्या परिपत्रकानुसार काही शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे तर काही शिक्षकांना घरून आभासी शिक्षण प्रक्रियेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी आभासी शिक्षण प्रक्रिया सुरू आहे.१७ ऑगस्ट च्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षकांना आभासी  शिक्षणात पूर्णवेळ सहभागीही होता यावे यासाठी स्थानिक प्रशासनमार्फत कोवीड सर्वेक्षणातील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची विनंती नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे यांनी केली . यावेळी रमेश काकडे , प्रमोद रेवतकर ,संजय वारकर , धनराज राऊत, विष्णू राणे , अरूण कराळे,लक्ष्मीकांत व्होरा राजेश धुंदाड, ज्ञानेश्वर साव उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here