वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या वतीने आज दिनांक 28/9/2020 रोज सोमवारला जिल्हा अध्यक्ष अशफाक खान सर यांच्या नेतृत्वात खालील मागण्या निवेदन यवतमाळ जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी चवणे साहेब यांना सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कोविड 19 च्या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे, जिल्ह्यातील डी.सी.पी.एस.धारक शिक्षक कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पहीला हप्ता ताबडतोब मिळणे बाबत,डी.सी.पी.एस.धारकांना त्यांच्या हिशोब चिठ्ठ्या दिल्याशिवाय एन.पी.एस.मध्ये रूपांतरित करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये, जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित ठेवलेल्या वरीष्ठ व निवड श्रेणीला कार्यालयाची मान्यता प्रदान करून प्रकरणे निकाली काढण्याबाबत, जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे अंतिम प्रदान,उपदान व इतर लाभ तात्काळ प्रदान करणेबाबत, वैद्यकीय परिपूर्तीचे प्रकरणे निकाली काढण्याबाबत,अशा अनेक प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी वेतनपथक अधिक्षक प्रमोद सोनटक्के, लेखाधिकारी अरविंद ठाकरे यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.त्यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर, सहकार्यवाह आनंद मेश्राम सर, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावणसिंग वडते सर, जिल्हा संघटक प्रभु गुंडेवाड सार मारेगाव तालुका अध्यक्ष पंकज राठोड सर राळेगाव तालुका कार्यवाह गोपाल बुरले सर व पांढरकवडा येथील सागर अल्लुरवार सर उपस्थित असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.







