महाराष्ट्र इंदिरा काँग्रेस कमिटीची ऑनलाईन बैठक संपन्न

धुळे (संतोष ‌कोळी) – जिल्ह्यातील इंदिरा काँग्रेस कमिटीचे व शिंदखेडा दोंडाईचा मतदारसंघातील बुलंद आवाज जिल्हा अध्यक्ष शामकांत सनेर यांनी महसूल मंत्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांची व महाराष्ट्रातील सर्व मंत्री महोदय व प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची सहित बैठक संपन्न झाली केंद्र शासनाच्या कृषी विधेयकांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने दोन ऑक्टोबरपासून तीव्र निदर्शने करण्याचा बैठकीत निर्णय झाला.
2 ऑक्टोबर पासून तहसील कार्यालय समोर किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती समोर केंद्र शासनाच्या कृषी धोरणांच्या विरोधात मध्ये निदर्शने व धरणे आंदोलन आयोजित करण्याबाबत सूचना करण्यात आल्या तसेच सदर धोरण त्वरित रद्द करण्यात यावे यासाठी प्रत्येक गावातून शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन तयार करण्यात येणार आहे त्यासाठीही जिल्ह्याजिल्ह्यातून जास्तीत जास्त सह्यांचे निवेदन प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडे सादर करण्याचे सूचित करण्यात आले तसेच 10 ऑक्टोबर रोजी वर्च्युअल सभा आयोजन करण्यात येणार आहे त्या सर्वांचा प्रसारण प्रत्येक तालुका प्रत्येक गावापर्यंत कशा पद्धतीने प्रसारित करता येईल याबाबतही सूचना करण्यात आल्या.
बैठकीस आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब नामदार नितीन राऊत साहेब नामदार के सी पाडवी साहेब नामदार यशोमती ताई ठाकूर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव वामशी चांदणी आशिष दुवाजी व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here