मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती अंबरनाथ, आगरी सेना अंबरनाथ, मी अंबरनाथकर सामाजिक संघटना, शिवबा सरकार व माळी समाज सेवा संघ यांच्या सौजन्याने अंबरनाथ शहर मुंबई, ठाणे, कल्याण व महाराष्ट्रातील कोविड – १९ च्या या महामारीच्या आपत्तीजनक परिस्थितीत आपला कार्यभार सांभाळणारे डॉक्टर, नर्स वैद्यकीय स्टाफ, शासकीय निमशासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्ते यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमात पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय संजय धुमाळ तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुप्त विभागाचे संजय भेंडे, डॉ. गणेश राठोड, किशोर सोर खाते, आतिश पाटील, नगरसेवक सचिन पाटील, डॉक्टर तुषार बाविस्कर आधी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय विलास आंग्रे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबरनाथ शिक्षक सेनेच्या अध्यक्षा डॉ. भारती झोपे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. प्रतिभाताई महाजन यांनी केले. टीम द युवायाचे अध्यक्ष योगेश चलवादी यांनी आपल्या मनोगतात सर्व समित्यांचे आभार मानले व आम्हांला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याविषयी ऋण भावना व्यक्त केली. डॉक्टर गणेश राठोड यांनी आपल्या मनोगतात अशा या उल्लेखनीय कार्याचा गौरव केल्यामुळे आम्हाला एक वेगळी प्रेरणा आणि आत्मबल व समाज सेवेविषयी आणखीनच प्रोत्साहन मिळाले असे सांगितले.
कार्यक्रमाचे पाहुणे संजय धुमाळ यांनी कोविड-१९ काळामध्ये घडलेल्या काही प्रेरणादायी प्रसंगाचे वर्णन केले. समाजाकडून तसेच अंबरनाथकरांकडून मिळालेले सहकार्य व योगदान यामुळे आमच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन आणखीन कामात उत्साह निर्माण झाला असेही सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष उमेशदादा गुंजाळ यांनी सर्व समित्यांच्या कार्याचा गौरव करून वेळोवेळी समाजकार्यासाठी नेहमी आपल्याला सहकार्य करू असे आश्वासन दिले. आपण केलेले कार्य हे खरोखरच उल्लेखनीय असून तुम्हाला म्हणजे सर्व समित्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.







