देवळी शहरातील पुनर्नियुक्त सर्व्हेक्षकांना दिलासा

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी महेंद्र सालंकार, कार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा यांचे नेतृत्वात उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सीडंट कमांडर सुरेश बगळे वर्धा यांचे सोबत प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यात आली. देवळी येथील माझे कुटुंब माझी जवाबदारी या मोहीमे अंतर्गत काम करण्यासाठी ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती केलेली होती त्याबाबत संघटनेने आक्षेप नोंदविला.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे परिपत्रक क्र. कोरोना 2020/ प्र. क्र. 391/ आरोग्य 5, दि.11 सप्टेंबर 2020 नुसार शिक्षक कर्मचाऱ्यांची सदर कामासाठी नियुक्ती करता येणार नाही असे त्यांचे निदर्शनास आणून दिले तसेच ज्या शिक्षकांनी यापूर्वी दोन महिन्याच्या वरील कालावधीसाठी कोविड- 19 साठी ( नोडल अधिकारी, सर्व्हेक्षक, निगराणी पथक, कंटेन्मेंट झोन, कॉल सेंटर इत्यादी ) काम केलेले आहे त्यांच्या सेवा सदर कामासाठी पुन्हा घेण्यात येऊ नये अशी मागणी केली. यावर त्यांनी तात्काळ सदर कामास 4 दिवसासाठी स्थगिती दिली व उद्या दुपारी 2.00 वाजता त्यांचे दालनात सदर मोहिमेशी संबंधीत अधिकाऱ्यांची सभा बोलावलेली आहे. त्यामुळे पुनर्नियुक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या चर्चेच्या वेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धाचे कार्यवाह महेंद्र सालंकार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे, धर्मेश झाडे, मेहरकिरण गुजर, प्रशांत भुते, महेंद्र बदूकले, संजय पारिसे, विजय पिंपळकर, सुनील राठी, हरिओम उगेमुगे, राजू रोकडे, पवन घंगारे, दिगंबर धुर्वे, सचिन सावरकर, तीलकराज सोनटक्के, जगदीश यावले, शशिकांत वाळके, समिउद्दीन पठाण, सुनील राठी, राकेश वाडीभस्मे, प्रकाश पचाडे, सुनील काळबांडे व देवळी तालुक्यातील संबंधीत शिक्षक तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे इतर पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here