पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) –आज पिंपरी चिंचवडचे नविन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे मराशी व ये हाल, हे पुस्तक भेट देऊन स्वगत केले. त्यावेळी ते बोलत होते, पारधी बोली भाषा व त्यांच्या रुढी परंपरा हे मराशी पुस्तक रुपी पहिल्यांदाच आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांनी लोकांसमोर परखडपणे मांडल्यामुळे पारधी समाजातील व्यथा लोकांना समजल्या,दैना, मराशी व ये हाल,या लिखाणाद्रारे खऱ्या कष्टकरी पारधी समाजातील कुटुबांच्या व्यथा समोर आल्यामुळे पारधी समाजातील लोकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला.
आज पोलिस आणि पारधी यांच्यातील मैत्रीचे नाते तयार झाल्यामुळे अनेक कुटुंबाला गाववेस्तेत न्याय मिळाला, बुलडाना, अहमदनगर, सांगली, या जिल्ह्यातील पारधी समाजातील लोकांनच्या लोकांसाठी विशेष उपक्रम मी पोलिस अधीक्षक असताना राबवले त्यामध्ये अनेक कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात यश आले. गरीबावर अन्याय करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली, साहित्यिक, नामदेव ज्ञानदेव भोसले याचे कांम कौतुकास्पद आहे.
त्यांनी कांही नसताना आपले जिवन उभारत. आज अथांग परिश्रमांतून पारधी समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध उपक्रमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते कामं करत आहेत,अनेक कुटुंबाला न्याय मिळाल्यामुळे आपल्या कलंकित जिवनातून बाहेर पढून मुले शिक्षणाच्या प्रवाहात आले गावामध्ये चांगले मानाचे स्थान मिळाले ,आज नामदेव भोसले या कामांची दखल घेऊन अनेक I.A.S.व I.P.S.अशा अनेक विरीष्ट अधिकारी यांनी त्यांच्या घरी भेटी दिल्या या मी सुद्धा नामदेव याच्या घरी जाउन आलो अशा शब्दात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त मा कृष्ण प्रकाश साहेब यांनी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले,याचे कौतुक केले, या वेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब यांना ” मराशी,व ये हाल, हे पुस्तक भेट देऊन स्वगत करता संपादक विशाल धेंडे, व पुणे जिल्हा प्रतिनिधी निलेश चांदगुडे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव ज्ञानदेव भोसले,स्वप्रित भोसले. रोहित भोसले, बलवर पवार. सुनिल काळे. कुणाल भोसले, उपस्थित होते.







